Loading...

सोम-शनि: सकाळी 09.30 am ते संध्या 06.00 pm

about about

संस्थेविषयी - गुंतवणूकीला बळ देऊ .....ऊंच भरारी  घेऊ !!!!

सावळेश्वर अर्बन संस्थेची 2020 रोजी स्थापना करण्यात आली. जालना शहरातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री आणि शहागड पंचक्रोशोतील नागरिकांना नागरिकांच्या आणि व्यावसायिकांच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी म्हणून सावळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीची सुरवात करण्यात आली. श्री. ज्ञानेश्वर मधुकर उडदंगे (संस्थापक अध्यक्ष) यांच्या रूपात संस्थेला एक तरुण, जाणकार आणि होतकरू नेतृत लाभलं आहे. आज जालना मध्ये सावळेश्वर अर्बन पतसंस्थेच्या एकूण 2 शाखा आहेत, ज्यात 5 कोटी रुपयांच्या ठेवी असून 3 कोटी रुपयांचे आजवर संस्थेने कर्जवाटप केले आहे.जवाटप केले आहे.

सावळेश्वर अर्बन पतसंस्थेची स्थापना 3 वर्षांपूर्वीच झालेली असली तरी, सर्वोत्तम सेवा व सुविधेंच्या बळावर संस्थेने अत्यंत्य कमी वेळात भरपूर लोकप्रियता प्राप्त केली. आज बँकेचे 2500+ हुन अधिक समाधानी व आनंदी ग्राहक आहेत, आणि हा आकडा झपाट्याने वाढतो आहे. ग्राहकाच्या ठेवींवर सर्वोत्तम परतावा आणि तुमच्या मेहनतीची कमाई सुरक्षित ठेवण्यासाठी सावळेश्वर अर्बन पतसंस्था एक सर्वोत्तम दालन आहे याची आम्ही खात्री देतो.

संस्थापकाचे मनोगत

मनोगत

बँक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते पैशाचे व्यवहार करणारी एक संस्था; पण मला वाटतं बँक हे व्यवहाराचं नाही तर आपुलकीच दालन असावं. जिथे प्रत्येक ग्राहकाशी बँकेचं अतूट नातं असावं, प्रत्येकाला विचारलं जावं 'तुमचा व्यवसाय कसा सुरु आहे?' 'मुलीचं ऍडमिशन झालं का?' 'वडिलांची तब्बेत कशी आहे?' इ. आणि सगळ्यात शेवटी आपुलकीने सांगितलं जावं की 'कुठल्याही अर्थीक मदतीसाठी आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत' आम्ही हेच चित्र सत्यात उतरवलं सावळेश्वर अर्बन च्या रूपात. ही संस्था सुरु करण्या मागचं आणखी एक कारण म्हणजे, जालना शहर आज जितकं ऐतिहासिक वारस्याने समृद्ध आहे तितकच आर्थिक दृष्ट्याही समुद्ध व्हायला हवं ही माझी इच्छा आहे. त्यामुळे आता केवळ आर्थिक अडचणींमुळे कुणाचीही स्वप्न अपूर्ण राहणार नाहीत, प्रत्येकाची कष्टाची कमाई सुरक्षित राहील आणि त्यावर ग्राहकांना उत्तम परतावा मिळेल याची मी शाश्वती देतो, कारण सावळेश्वर अर्बन पतसंस्था केवळ व्यावहारांची नाही - तर आपुलकीची बँक आहे !

ध्येय, लक्ष आणि मूल्ये

ध्येय

कुठल्याही शहराचा विकास होण्या आधी तेथील नागरिकांचा विकास होणं फार महत्वाचं असतं, म्हणूनच आम्ही जालनाच्या विकासासाठी प्रथम इथल्या नागरिकांना आणि उद्योग-व्यवसायांना सक्षम बनवण्याचं ठरवलं. या जालनाच्या पावन भूमीला संत-माहात्म्यांचा शेकडो वर्षांचा इतिहास लाभला आहे, या ऐतिहासिक वारस्याने समृद्ध शहराला आणि येथील नागरिकांना आता आर्थिक दृष्ट्या देखील सक्षम बनवणं हेच सावळेश्वर अर्बन पतससंस्थेचं ध्येय आहे.

लक्ष

आम्ही जाणतो प्रत्येक कुटुंबाचं आणि कुटूंबातील प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्याचं बळ आणि चिकाटी तर सर्वांकडे असते, मात्र अडचण असते ती पैशांची. शेती असो वा तंत्रज्ञान, शिक्षण असो वा व्यवसाय क्षेत्र कुठंही असो स्वप्नांची उंच भरारी घेऊ पाहणाऱ्या प्रत्येकाला आता सावळेश्वर अर्बन पतसंस्थाचा पाठींबा असेल कारण पुढील काही वर्षात शेकडो स्वप्नपूर्ती करण्याचं आमचं लक्ष आहे.

मूल्ये

बँक हा केवळ व्यवहाराचा नाही तर शेकडो ग्राहकाच्या भावनांचा देखील भाग आहे. आयुष्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या विश्वासाने आपल्या कष्टाची जी कमाई खात्यात ठेवली आहे, तिला सुरक्षित ठेवणे आणि वाढवणं ही आम्ही आमची जवाबदारी समजतो, म्हणुत तर ग्राहकाची प्रगती, परिपूर्ण पारदर्शकता व वचनबद्धता हे सावळेश्वर अर्बन तससंस्थेचे प्रमुख मूल्य आहेत.

संचालक मंडळ

ज्ञानेश्वर मधुकर उडदंगे

संस्थापक अध्यक्ष

रणजित सालिकराम बांगर सर

व्हॉइस चेअरमण

Dr. विष्णु सकुंडे

संचालक

Ado.विजय देविदास खटके

सचिव

विठ्ठल भाऊसाहेब गारुळे

संचालक

नारायण कचरू कणके

संचालक

भानुदास नामदेव केकाण

संचालक

राजेंद्र छत्रगुण कणके

संचालक

एकनाथ विठ्ठल कोल्हे

संचालक

काकासाहेब रावसाहेब राठोड

संचालक

बाळासाहेब लहुराव चौधरी

संचालक

सोपान मधुकर उडदंगे

संचालक

शुभांगी ज्ञानेश्वर उडदंगे

संस्थापक

श्री सावळेश्वर महिला अर्बन को -आप क्रेडिट सोसायटी मर्या. शहागड .

आदिनाथ शंकरराव मतकर

शाखा व्यवस्थापक

श्री सावळेश्वर महिला अर्बन को -आप क्रेडिट सोसायटी मर्या . शहागड .

Copyright © 2023 Sawleshwar Urban , Website Designed by SASH MEDIA